ओझोन वायू , ओझोन थर, ozone


                  ओझोन थर

           
                      आज आपण ओझन थराविषयी माहिती घेऊया साधारणत: सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा वायू म्हणजे ओझोन वायू अशी आपल्याला त्याची ओळख आहे .हा वायू स्थितांबराच्या खालच्या थरात आढळतो. जगभरात 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन पट्ट्याच्या संरक्षणासाठी ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो .ओझोन पट्ट्याला धोकादायक असणाऱ्या पदार्थांना वापरातून बंद करण्याबाबत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 16 सप्टेंबर 1987 ला केला म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 
                    संयुक्त राष्ट्र संघाकडून पर्यावरण संरक्षणाच्या जागृतीसाठी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो. प्रथमतः जागतिक पर्यावरण दिन 1974 यावर्षी साजरा करण्यात आला सागरी प्रदूषण मानवी लोकसंख्या वाढ जागतिक तापमान वाढ त्यामुळे पर्यावरणासंबंधी निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत जागृती ,तसेच संसाधनांच्या शाश्वत वापर करण्यास प्रवृत्त करणे हा त्यामागचा हेतू होय.         
पर्यावरण दिनाच्या यजमानचा बहुमान या वर्षी भारताला मिळाला. या वर्षीची पर्यावरण दिनाची संकल्पना Beat Plastic Pollution अशी होती.
       मुख्यतः ओझोन ऑक्सिजनच्या तीन   अणूपासून बनलेला असतो.साधारणतःतो स्थितांबराच्या खालच्या भागात आढळतो.ओझोन चा ऱ्हास मुख्यतः         CFC,NO,NO2,मिथेन इत्यादिमूळे होतो.ओझोन थराला पडलेले छिद्र सर्वप्रथम 1985 मध्ये  अंटार्टिकावर शास्त्रज्ञानांच्या निदर्शनास आले.त्यांच्या मतानुसार 1977-1984 पर्यंत ओझोनच्या प्रमाणात जवळपास 40% घट झाली.     
              अशा धोक्याच्या घंटेनंतर ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला त्यासाठी विविध करार करणयात आले ते पुढीलप्रमाणे:
       ★ व्हिएन्ना करार 1985
       ★मॉन्ट्रियल करार 1987
       ★लंडन करार 1989
       ★कोपेनहेगन परिषद 1992.
       याशिवाय इतरही अनेक प्रकारे ओझन चा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण फक्त एवढ्यावरच थांबून आपल्याला चालणार नाही आपलाही त्यात काही ना काही हातभार लागला पाहिजे आपण काय करू शकतो>>>
      1) सिग्नलला गाडी बंद ठेवणे
      2) फ्रीझ चा मर्यादित वापर
      3) प्लास्टिक न जाळणे.
    अशा अनेक प्रकारे आपण ओझोनचे संतुलन ठेवण्यास मदत करू शकतो.नाहीतर जागतिक तापमानात आणखी वाढ होऊन पृथ्वीवर राहणे असह्य होऊन जाइल.म्हणतात ना "आपल्याच हाती आहे आपले भविष्य".....
                                               
                                            -----@G
      


No comments:

Post a comment

Latest

26 may events----

1739 - Afghanistan separated from Indian empire as a result of treaty between Mughal Emperor Mahmud Shah and Persian emperor Nadir Shah. 199...