राज्यपाल /GOVERNOR

                ★  राज्यपाल  ★

                          ★GOVERNOR  ★   

         सध्याचे राज्यपाल खुपच चर्चेत असतात चला तर आज आपण राज्यपाल यांची माहिती थोडक्यात  पाहूयात  घटक राज्याचा पहिला नागरिक म्हणून आपण राज्यपालांना ओळखतो. ते घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख व राज्य विधिमंडळाचे अंग असतात .भारतीय संविधानाच्या 153 कलामान्वये प्रत्येक राज्याचे राज्यपाल असेल तथापि 7 वी घटना दुरुस्ती 1956  नुसार एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. कलम 155 नवीन राष्ट्रपती आपल्या सहीनिशी व स्वमुद्रांकीत अधिपत्राद्वारे राज्यपालांची नेमणूक करतात.
                त्यांचा  किमान पदावधी घटनेने निश्चित केलेला नाही मात्र राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करू शकतात. राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. राज्यपाल होण्यासाठी पात्रता वय पस्तीस वर्ष पूर्ण असली पाहिजे .तसेच तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. राज्यपालांसाठी वेतन साडेतीन लाख रुपये प्रति महिना (हे एक फेब्रुवारी 2018 पासून) .

                स्वतंत्र भारतातील घटक राज्याच्या पहिला महिला राज्यपाल  म्हणून सरोजनी नायडू यांना ओळखले जाते. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश डिसेंबर 1956 ते 1962 पर्यंत. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित 1962 ते 64 .तसेच आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले राज्यपाल डॉक्टर पीसी अलेक्झांडर 1993 ते 2002 .
                आपण महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यपालांची माहिती पाहूयात. त्यांचे पूर्ण नाव भगतसिंग गोपाल सिंह कोश्यारी आहे. त्यांचा जन्म 17 जून 1942 ला बागेश्वर उत्तराखंड येथे झाला. त्यांनी 5 सप्टेंबर 2019 ला पदभार स्वीकारला ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल होत. त्यांनी प्राध्यापक, लेखक ,पत्रकार, राजकारणी असे विविध क्षेत्रात कार्य केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
(2020)
                     कारकीर्दीविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यांनी अलमोरा कॉलेज उत्तर प्रदेश मधून इंग्रजी साहित्यात एम.ए केले आहे. राजा इंटर कॉलेज येथे काही दिवस त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.तसेच ते पर्वत पियुष या साप्ताहिकाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी जुलै 1975 ते मार्च 1974 पर्यंत राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान तुरुंगवास भोगला.
                  मे 1997 मध्ये ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य तसे 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री होते तसेच त्यांनी उत्तराखंड राज्याचे भाजपाचे पहिले राज्य घटक अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले
                  त्यांची  उत्तरांचल प्रदेश क्यूँ? आणि उत्तरांचल संघर्ष एवं  समाधान इत्यादि प्रसिद्ध पुस्तके आहेत...
                                                 -----@G

No comments:

Post a comment

Latest

26 may events----

1739 - Afghanistan separated from Indian empire as a result of treaty between Mughal Emperor Mahmud Shah and Persian emperor Nadir Shah. 199...