स्व:ताला ओळखूया, जगण्याचा आनंद घेऊया/how to choose career?

                      काहीच नाही ! काही समजतच नाही ! काही  काही वेळा विचार डोक एकदम सुन्न करून टाकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येत असते .प्रत्येकाच्या आयुष्याचा एक टप्पा महत्त्वाचा असतो. तो म्हणजे करिअर निवडण्याचा.त्यामुळे करिअर कोणते निवडावे याविषयी बरीच चर्चा चालू असते आपल्याला करिअरची निवड करताना सतर्क राहावं लागतं. असं म्हणतात की माणसांना नेहमी त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं .अगदी खर आहे त्यामुळे कशात पैसा जास्त आणि सगळे काय करतात याचा विचार न करता करिअर निवडताना स्वतःच्या आवडीचे सुसंगत असंच करिअर निवडायला हवं तरच ते काम करता जॉब सॅटीस्फॅक्शन मिळतं.
आवडीच्या क्षेत्रात खूप जास्त आणि भरीव काम करता येतं. आपल्या वेगाने प्रगती करता येत एकदा खेळाडू प्रवृत्तीचा माणूस जर दहा ते पाच या वेळेत काम करेल पण त्यात रमणार नाही समाधान होणार नाही याउलट एखाद्या प्रयोगशाळेत तासनतास रमणारा माणूस जर बँकेतील काम कशी पार पाडणार. स्वतःला कसं ओळखायचं तर त्यासाठी आपल्याकडे किंवा पूर्ण जगात बऱ्याच संशोधनानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत .त्यापैकी काही आपण पाहू .....
■  आपल्यासमोर जेव्हा अनेक रस्ते असतात तेव्हा आपल्या शिक्षण आणि समोर असलेल्या संधी यांचा एक व्यवस्थित रित्या केलेला शांत मनाने केलेला कसे उपयोगी पडतो मध्ये आपलं नक्की काय हवे आणि कुठे जायचं या कळायला पाहिजे. मनातला गोंधळ संपेल.
■ आपल्यासमोर अशीही काही माणस असतात की आपल्याला काय आवडते ते नीट जाणीव होऊनही त्यांना संधी मिळत नाही. अशांचे गन लपूनच राहतात. ते संसार नोकरी किंवा घरकामात बुडून जातात स्वतःला गुणांची जाणीव करून देत नाहीत. असं होऊ नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न आपणच करायला हवे .आपले छंद आपल्या आवडी यांना जागतं ठेवले पाहिजे.....
                            काय चुकलं ते शोधायचं आणि चालायचं एखाद्या वेळी माघार घ्यावी लागली तर त्याची कारणं तपासून बघायची इतकंच...
■ नेहमीच आपल्यासमोर समान संधी असतात. असं म्हणतात की आपण जर सुंदरशा टेकडीवर असलो तर तिथून खालचं चित्र छान वाटतं तिथे जावं वाटतं. आणि जर खाली आलो तर हिरवेगार टेकडी , तिच आकाशात घुसलेल टोक तिथे वाहणारा मोकळा वारा यांची  भुरळ पडते हे अनेकदा बहुतेकदा नेहमीच घडत. तसेच करिअरच्या बाबतीत 'पलीकडचे चित्र सुखावह वाटणं', हे घडत असतं मानवी स्वभावच आहे तो यातला आकर्षणाचा भाग बाजूला ठेवायचा आणि स्वतःला तपासून विचार करायचा की मला नक्की काय करायला जायचं तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जास्त गरज आहे.....😊
           

No comments:

Post a comment

Latest

26 may events----

1739 - Afghanistan separated from Indian empire as a result of treaty between Mughal Emperor Mahmud Shah and Persian emperor Nadir Shah. 199...