संविधान वैशिष्ट्ये

      * संविधानाची प्राथमिकता *
         1773 चा रेग्युलेटिंग एक्ट ही भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते 1928च्या नेहरू रिपोर्ट मध्ये भावी संविधानाविषयी काही प्रमुख शिफारशी करण्यात आल्या होत्या त्यामध्ये संघराज्य पद्धतीची रचना, द्विगृही कायदेमंडळ ,राज्यांची विधिमंडळ ,सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांची यादी तसेच इतरही अनेक अशा शिफारशी त्यामध्ये करण्यात आल्या होत्या .
          1935 चा भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतीय संविधानाच्या बराचसा भाग आधारित आहे 1935 च्या कायद्यातून संघराज्य संकल्पना ,न्यायसंस्था , लोकसेवा आयोग राज्यपालांचे पद याप्रमाणे जवळपास 250 तरतुदी आपण घेतलेल्या आहेत. भारतात लोकशाही पद्धतीने कायद्यावर आधारलेले राज्य स्थापन करणे हे भारतीय संविधानाचा मुख्य हेतू आहे .राज्यघटनेत एकूण 25 भाग आहेत .सुरुवातीला त्यात 22 भाग होते त्यापैकी सातवा भाग निरसित करण्यात आला तर 4A,9A,9B, 14A हे निर्माण करण्यात आले.
        घटनेतील मूलभूत अधिकारांची संख्या ही सहा तर मूलभूत कर्तव्य यांची संख्या 11आहे . 86 वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्क मानला गेला असून त्याच्याशी घटना कलम 21A  संबंधित आहे 1 एप्रिल 2010 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा राष्ट्रास समर्पित केला.
         आता आपण संविधानाच्या सरनाम्याविषयी माहिती पाहू .उद्देश पत्रिका त्यालाच सरनामा असे म्हटले जाते .त्याला घटनेचा प्राण किंवा आत्मा असे म्हटले जाते. काही घटनाकारांनी सरनामा ही घटनेची गुरुकिल्ली आहे असे संबोधले आहे .व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवून सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारले पाहिजे त्यांचे आकलन उद्देशपत्रिका द्वारे स्पष्ट होते. हा सरनामा 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीने मंजूर केला तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. या सरनाम्यातून  काही गोष्टी स्पष्ट होतात म्हणजेच घटनेचे उगमस्थान ,राज्य व्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचा उद्देश.
       आता आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूया :-
1)सार्वभौम घटना समिती द्वारा संविधानाची निर्मिती 

2)विस्तृत आणि लिखित राज्यघटना 

3)राज्यघटनेनुसार भारत सार्वभौम,           प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे 

4)राष्ट्रकुलचे सभासदत्व भारताने स्वीकारले आहे 

5)संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार 

6)लोक कल्याणकारी राज्याचा निर्देश 

7)धर्मनिरपेक्षता 

8)एकेरी नागरिकत्व 

9)मूलभूत हक्क

10) मार्गदर्शक तत्त्वे

11) न्यायालय व संसद यांचे श्रेष्ठत्व..


No comments:

Post a comment

Latest

26 may events----

1739 - Afghanistan separated from Indian empire as a result of treaty between Mughal Emperor Mahmud Shah and Persian emperor Nadir Shah. 199...